black and white bed linen

विश्वास, गुणवत्ता आणि सेवा यांचा संगम – वेदांत नर्सिंग स्कूल (GNM)

Welcome to Vedant Nursing School

आमचे शिक्षण संस्था शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत सोयीस्कर ठिकाणी स्थित आहे. विद्यार्थिनींसाठी सिटीबस मोफत उपलब्ध असून त्यांच्या प्रवासाची विशेष काळजी घेतली जाते. शाळेमध्ये सुसज्ज क्लासरूम असून त्यामध्ये लाईट, फॅन, व्हाईट बोर्ड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी स्वतंत्र वहानाची व्यवस्थाही केली आहे. संस्थेमध्ये आधुनिक नर्सिंग लॅब, ग्रंथालय व सुसज्ज कॉम्प्युटर रूम देखील आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची सुविधा असून, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध आहे. या सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

सुविधा
शैक्षणिक सुविधा.

आमच्या संस्थेमध्ये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, एन.टी., डी.एन.टी., व्ही.जे.एन.टी. तसेच एस.बी.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार योजना आणि कामगार विभागाच्या आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ मिळतो. विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था माफक दरात वसतीगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकं आणि युनिफॉर्म यांचा पुरवठाही अत्यंत माफक दरात केला जातो. शिक्षणासाठी संस्थेमध्ये अनुभवी शिक्षक कार्यरत असून प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रभावी शिक्षण दिले जाते. या सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.

15 वर्षांचा अनुभव, तज्ज्ञ नर्सिंग प्रशिक्षण

वेदांत नर्सिंग स्कूल गेली 15 वर्षं गुणवत्तापूर्ण आणि तज्ज्ञ नर्सिंग शिक्षण देत आहे. अनुभवी शिक्षकवर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, आणि रुग्णालयांशी संलग्न व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना सक्षम आरोग्यसेवक बनवतो. आमचं ध्येय – समाजासाठी सेवाभावी, कुशल आणि आत्मविश्वासू नर्सेस घडवणं!

सांस्‍कृतीक कार्यक्रम.

विदृयार्थ्‍यांना सर्वागीन विकास विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात जसे नर्सेस डे, Lamp Lighting ceremorey, Fewell Party, विविध गणदर्शन स्‍पर्धा, Indoor Games, गणपती स्‍थापना, शैक्षणिक सहल, गणवंत विदृयार्थी सत्‍कार, विविध सांस्‍कृतीक स्‍पर्धा.

हॉस्‍पीटल सुविधा

विदृयार्थ्‍यांना प्रात्‍यक्षीक अनुभवासाठी शहरातील सर्वात मोठे विवेकानंदा हॉस्‍पीटल तसेच श्‍वास हॉस्‍पीटल, गॅलक्‍सी हॉस्‍पीटल, बदमदे हॉस्‍पीटल, बिरादार स्‍त्री रोग हॉस्‍पीटल, गरुमाऊली हॉस्‍पीटल, येलाले हॉस्‍पीटल, पोतदार हॉस्‍पीटल, गुगळे हॉस्‍पीटल, देशपांडे हॉस्‍पीटल, कृष्‍णा हॉस्‍पीटल, हाळणीकर हॉस्‍पीटल, प्रेरणा हॉस्‍पीटल, सावली हॉस्‍पीटल, प्राथमिक आरोग्‍य केंद्र (शहरी / ग्रामीण) येथे विदृयार्थ्‍यांना स्‍वतंत्र वाहनाने सुरक्षित पाठविण्‍यात येते. तसेच MSBNPE मुंबईच्‍या नियमाप्रमाणे सर्व क्षेत्रिय भेटी पुर्ण केल्‍या जातात.

Get in Touch with Us

Contact us for inquiries about nursing education and admissions.